Books

Friday, April 3, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय महिलांसाठी केलेले योगदान

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय महिलांसाठी केलेले योगदान 


        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी व दलितांसाठी जेवढे कार्य केले त्यापेक्षाही जास्त महिलांसाठी केलेले आहे. त्यांनी भारतीय संविधानात स्त्रीयांना शिक्षणाचा आणि स्वावलंबी जीवनासाठी नोकरी करण्याचा अधिकार दिला. 

        स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले. त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. परंतु हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली. (जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिले राष्ट्र आहे.)

        स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच समान अधिकार मिळवून दिला. दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

        एका मागे एक असे वारंवार मूल जन्माला घालताना महिलांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळावी व स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला. तसेच मुलं होऊ देणे अगर न देणे याचा निर्णय घेण्याचा महिलांना अधिकार दिला.

        मुलगा हा वंशाचा दिवा व मुलगी ही परक्याचे धन अशा विचारसरणीतुन गर्भपात करून होणारी स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी जनजागृती केली.

        एखाद्या देशाने किती प्रगती केली याचे मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवरून करावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी प्रमुख योगदान:

  • हिंदू कोड बिल (Hindu Code Bill): महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी हे बिल मांडले, ज्यात प्रामुख्याने:
    • हिंदू विवाह कायदा (1955): महिलांना घटस्फोटाचा आणि पोटगीचा अधिकार।
    • हिंदू उत्तराधिकार कायदा (1956): वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांच्या बरोबरीने मुलींना समान हिस्सा।
    • हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा (1956): महिलांना स्वतःच्या नावावर मूल दत्तक घेण्याचा अधिकार।
  • कामगार महिलांसाठी योगदान: खाणकामात काम करणाऱ्या महिलांसाठी 'माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ॲक्ट' द्वारे प्रसूती रजेची तरतूद केली।
  • शिक्षण आणि सक्षमीकरण: "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे" असे मानून त्यांनी महिलांच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले। त्यांनी महिलांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मूलमंत्र दिला।
  • सामाजिक सुधारणा: त्यांनी देवदासी प्रथा, बालविवाह आणि बालहट्ट यांसारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांना विरोध केला।
  •                           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  महिलांसाठी प्रमुख  योगदान ऑनलाईन  उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात.

( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 




Articles / लेख





YouTube Video/ व्हिडिओ 



Research / संशोधन









Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :





**Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources)

Wednesday, March 18, 2026

चवदार तळे सत्याग्रह

 चवदार तळे सत्याग्रह 


२० मार्च १९२७

महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांच्या मानवी हक्कांसाठी आणि सामाजिक समतेसाठी केलेला एक ऐतिहासिक लढा होता. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना वापरण्यास मज्जाव होता, या अन्यायी जातीय व्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी हजारो अनुयायांसह स्वतः पाणी पिऊन हा सत्याग्रह केला. हा लढा सामाजिक समतेचा आणि 'मानवी प्रतिष्ठा' मिळवून देणारा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ या दिवशी झाला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन (Social Empowerment Day) तसेच 'समता दिन' म्हणून साजरा केला जातो.


चवदार तळे सत्याग्रह  दिनानिमित्त ऑनलाईन  उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात.

( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 










Articles / लेख 










YouTube Video/ व्हिडिओ 




Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :







Research / संशोधन







Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources). 



Saturday, February 22, 2025

संत गाडगे महाराज

 


संत गाडगे महाराज 

(२३ फेब्रुवारी१८७६—२० डिसेंबर १९५६). 

संत गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकारथोर आधुनिक मराठी संत  आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.
संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जाणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.

गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. 


( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )

 ग्रंथ/ Books:  

१. संत गाडगे महाराज काल आणि कर्तृत्च









२.श्री संत गाडगेबाबा - Satyashodhak

3 गाडगे बाबा - लोकसेवा के कर्मयोगी (सचित्र) - हिंदी - प्रेरक जीवनी








4 गाडगेबाबा कविता

लेख/Articles:

1समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज

2गाडगे महाराज : गाडगेबाबांनी महाराष्ट्रात किर्तनाच्या किर्तनाच्या माध्यमातून पिढ्यांना घडवलं, असं का म्हटलं जातं?

3 संत गाडगे महाराज यांचे वऱ्हाडी भाषेतील किर्तन

4 माणसात देव पाहिलेले संत गाडगे महाराज - Mumbai Tarun Bharat


युट्यूब व्हिडिओ /Youtube Video:

1 गाडगे बाबा जीवनचरित्र भाग-१

2 गाडगे महाराज (Gadge Maharaj) कीर्तन 1956 |

3 संत गाडगे महाराज कविता

4 राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या आवाजातील शेवटचे कीर्तन,गाडगे ...

5 Devki Nandan Gopala - Marathi Film


संशोधन /Research:

1 संत गाडगेबाबांची सामाजिक विचार :एक समाजशास्त्रीय अभ्यास

2 संत गाडगे महाराजांची जीवन आणि समाज प्रबोधन

3 संत गाडगे महाराजांचे शिक्षण विषयक विचार व कार्य एक चिकित्सक अभ्यास

इतर/other Sources:

1 गाडगे महाराज (Gadge Maharaj) - मराठी विश्वकोश

2गाडगे महाराज - विकिपीडिया

3 संत गाडगे बाबांची माहिती

4 गाडगेबाबा : प्रबोधनाचे विचारपीठ

5 समाजसुधारक: संत गाडगे महाराज

6 गाडगे महाराज - History of India 


Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources). 










Sunday, July 21, 2024

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (lokmany Baal Gangadhadhar Tilak )

 




लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


                                                  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

जन्मनाव: केशव गंगाधर टिळक

(जुलै २३१८५६ - ऑगस्ट ११९२०)


          बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.

टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हणले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हणले.

लाल-बाल-पाल

टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात





निवडक ग्रंथ :

Magazines/मासिकं :

Youtube व्हिडिओ :  



Online  वैचारिक संवाद :


News Paper Clipping:


* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.

Sunday, February 4, 2024

मराठी भाषा गौरव दिन

 

"मराठी भाषा गौरव दिन"


    मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात 'विवेकसिंधू' (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.

    कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. 

     कुसुमाग्रजांच्या कारकीर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्‍या या रुपात सुंदर साहित्य तयार केलं. 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कवितासंग्रह, विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखणीपैकी एक आहे. मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्थापना केली. 
    महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमाद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो. 
 
मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे.
 
मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके. अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.
 
    मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते.
 
    आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत  इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्तव टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणार्‍या पिढील मराठी साहित्याची ओळख करुन दिली पाहिजे. संतांनी, लेखकांनी, इतिहासकरांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल.
 
    आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगावा. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी तसेज जोपसण्यासाठी प्रयत्न करावेत. 
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )

 Books/पुस्तकं : 

1. मराठी भाषा वक्प्रचार म्हणी इत्यादी : शंकर नरहर जोशी

2. भाषा संचालनालयाचे परिभाषा कोश

3.मो.रा.वाळिंबे मराठी व्याकरण

4. मराठी भाषा उद्गम आणि विकास


 Articles :

1.मराठी भाषा दिन २०२५










Other Online Resources / 

1.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची प्रकाशने

2. भाषा संचालनालयाची प्रकाशने

3. राजभाषा परिचय |

4. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४

5. मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था ई- पुस्तके



Youtube Videos/

1. मराठी भाषेचा उगम व विकास

2. का साजरा होतो मराठी भाषा दिन | मराठी भाषेचा इतिहास

3.मराठी भाषा गौरव दिन भाषण


Research:

1. युरोपीयांचा मराठी भाषा वाङ्मयाचा अभ्यास व सेवा

2.मराठीचा प्रमाण आणि स्वरूप

3.मराठी भारुड वाङ्मय

4 उत्तर आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी कादंबरी

5.मराठी बुद्धी एकांकिका चा चिकीत्सक अभ्यास



Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources).