Books

Friday, April 3, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय महिलांसाठी केलेले योगदान

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय महिलांसाठी केलेले योगदान 


        डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी व दलितांसाठी जेवढे कार्य केले त्यापेक्षाही जास्त महिलांसाठी केलेले आहे. त्यांनी भारतीय संविधानात स्त्रीयांना शिक्षणाचा आणि स्वावलंबी जीवनासाठी नोकरी करण्याचा अधिकार दिला. 

        स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले. त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले. परंतु हिंदू कोड बिल मंजूर नाही झाले म्हणून मंत्रिमंडळातून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भावस्था काळात ६ महिन्याच्या भरपगारी रजेची तरतूद केली. (जगात अशी तरतूद करणारे भारत हे पहिले राष्ट्र आहे.)

        स्त्रीयांना (मुलींना) वडीलांच्या चल-अचल संपत्तीवर मुलांच्या इतकाच समान अधिकार मिळवून दिला. दुसरी पत्नी असेल तर पत्नीला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मिळवून दिला.

        एका मागे एक असे वारंवार मूल जन्माला घालताना महिलांना होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळावी व स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा दिला. तसेच मुलं होऊ देणे अगर न देणे याचा निर्णय घेण्याचा महिलांना अधिकार दिला.

        मुलगा हा वंशाचा दिवा व मुलगी ही परक्याचे धन अशा विचारसरणीतुन गर्भपात करून होणारी स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी जनजागृती केली.

        एखाद्या देशाने किती प्रगती केली याचे मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवरून करावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांसाठी प्रमुख योगदान:

  • हिंदू कोड बिल (Hindu Code Bill): महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी हे बिल मांडले, ज्यात प्रामुख्याने:
    • हिंदू विवाह कायदा (1955): महिलांना घटस्फोटाचा आणि पोटगीचा अधिकार।
    • हिंदू उत्तराधिकार कायदा (1956): वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांच्या बरोबरीने मुलींना समान हिस्सा।
    • हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा (1956): महिलांना स्वतःच्या नावावर मूल दत्तक घेण्याचा अधिकार।
  • कामगार महिलांसाठी योगदान: खाणकामात काम करणाऱ्या महिलांसाठी 'माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ॲक्ट' द्वारे प्रसूती रजेची तरतूद केली।
  • शिक्षण आणि सक्षमीकरण: "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे" असे मानून त्यांनी महिलांच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले। त्यांनी महिलांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा मूलमंत्र दिला।
  • सामाजिक सुधारणा: त्यांनी देवदासी प्रथा, बालविवाह आणि बालहट्ट यांसारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांना विरोध केला।
  •                           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  महिलांसाठी प्रमुख  योगदान ऑनलाईन  उपलब्ध  माहिती आपण जाणून घेऊ यात.

( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 




Articles / लेख





YouTube Video/ व्हिडिओ 



Research / संशोधन









Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :





**Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources)

No comments:

Post a Comment