केशव सीताराम ठाकरे
उर्फ
प्रबोधनकार ठाकरे
(17 सप्टेंबर 1885 – 20 नोव्हेंबर1973)
प्रबोधनकार ठाकरे (केशव सीताराम ठाकरे) हे एक प्रसिद्ध समाजसुधारक, पत्रकार, लेखक आणि राजकारणी होते, ज्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला.प्रबोधनकारांनी महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, आगरकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारला. त्यांनी सत्यशोधक समाजाची तळपती तलवातळपती तलवार म्हणून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, हुंडा विरोधी ,बालविवाह, विधवा केशवपन,हुंडा प्रथा, ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय सहभाग आणि त्यांच्या लिखाणातून तसेच भाषणातून सामाजिक सुधारणांवर जोर दिला आणि देवळांमधील पुरोहितशाही यांच्याविरुद्ध लढा दिला. त्यांच्या लेखन आणि वक्तृत्वातून त्यांनी रूढी-परंपरांचा तीव्र निषेध केला.
प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांनी मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलने, लेखन आणि वक्तृत्वातून योगदान दिले. त्यांचे मत होते की, धर्माने माणसाला माणुसकीने वागण्याची सवलत द्यावी; अन्यथा तो धर्म माणसांनी का जुमानावा.
प्रबोधनकारांनी पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व यांखेरीज नाटककार, चित्रपट संवादलेखक, अभिनेता, संगीतज्ञ, शिक्षक, छायाचित्रकार आणि टंकलेखक अशा अनेक क्षेत्रांत काम केले.
त्यांनी सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मार्गदर्शक होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट या ज्येष्ठ नेत्यांना संयुक्त महाराष्ट्राचे पंचायतन म्हटले गेले. हे कोणत्याही पक्षात नव्हते. त्यांनी स्वतंत्रपणे संपूर्ण आंदोलनावर वचक ठेवला. हे आंदोलन लढलं जात असताना प्रबोधनकार सत्तरीच्या जवळ होते. पण त्यांनी व्याख्यानांचा धुरळा उडवला. त्यांची लेखणी तर बेडरपणे चालत होती. त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरली.
प्रबोधनकारांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, ज्याची प्रेरणा प्रबोधनकारांच्या विचारांतून मिळाली.
त्यांचे दत्तकपुत्र रामभाऊ हरणे यांनीही सामाजिक कार्यात योगदान दिले आणि प्रबोधनकारांचे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत पोहोचवले.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने पुण्यात प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन आयोजित केले जाते, ज्यामध्ये त्यांच्या विचारांचा प्रसार केला जातो.
प्रबोधंकार ठाकरे यांचे समग्र साहित्य हे मराठी, हिन्दी , इंग्रजी आणि गुजराती भाषेत उपएलबीडीएच आहेत.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
Books/ पुस्तकं
Articles / लेख
YouTube Video/ व्हिडिओ
Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :
Research / संशोधन
* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources etc.
No comments:
Post a Comment