Books

Sunday, July 21, 2024

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (lokmany Baal Gangadhadhar Tilak )

 




लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


                                                  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 

जन्मनाव: केशव गंगाधर टिळक

(जुलै २३१८५६ - ऑगस्ट ११९२०)


          बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.

टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हणले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हणले.

लाल-बाल-पाल

टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात





निवडक ग्रंथ :

Magazines/मासिकं :

Youtube व्हिडिओ :  



Online  वैचारिक संवाद :


News Paper Clipping:


* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.

Sunday, February 4, 2024

मराठी भाषा गौरव दिन

 

"मराठी भाषा गौरव दिन"


    मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात 'विवेकसिंधू' (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.

    कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. 

     कुसुमाग्रजांच्या कारकीर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्‍या या रुपात सुंदर साहित्य तयार केलं. 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कवितासंग्रह, विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखणीपैकी एक आहे. मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्थापना केली. 
    महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमाद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो. 
 
मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे. मराठी भाषेची साहित्यसंपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे.
 
मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके. अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.
 
    मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते.
 
    आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत  इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्तव टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणार्‍या पिढील मराठी साहित्याची ओळख करुन दिली पाहिजे. संतांनी, लेखकांनी, इतिहासकरांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल.
 
    आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगावा. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी तसेज जोपसण्यासाठी प्रयत्न करावेत. 
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )

 Books/पुस्तकं : 

1. मराठी भाषा वक्प्रचार म्हणी इत्यादी : शंकर नरहर जोशी

2. भाषा संचालनालयाचे परिभाषा कोश

3.मो.रा.वाळिंबे मराठी व्याकरण

4. मराठी भाषा उद्गम आणि विकास


 Articles :

1.मराठी भाषा दिन २०२५










Other Online Resources / 

1.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची प्रकाशने

2. भाषा संचालनालयाची प्रकाशने

3. राजभाषा परिचय |

4. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४

5. मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था ई- पुस्तके



Youtube Videos/

1. मराठी भाषेचा उगम व विकास

2. का साजरा होतो मराठी भाषा दिन | मराठी भाषेचा इतिहास

3.मराठी भाषा गौरव दिन भाषण


Research:

1. युरोपीयांचा मराठी भाषा वाङ्मयाचा अभ्यास व सेवा

2.मराठीचा प्रमाण आणि स्वरूप

3.मराठी भारुड वाङ्मय

4 उत्तर आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी कादंबरी

5.मराठी बुद्धी एकांकिका चा चिकीत्सक अभ्यास



Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources). 


Sunday, January 7, 2024

 केशव सीताराम ठाकरे 

उर्फ 

प्रबोधनकार ठाकरे

(17 सप्टेंबर 1885 – 20 नोव्हेंबर1973) 


    प्रबोधनकार ठाकरे (केशव सीताराम ठाकरे) हे एक प्रसिद्ध समाजसुधारक, पत्रकार, लेखक आणि राजकारणी होते, ज्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला.प्रबोधनकारांनी महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, आगरकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारला. त्यांनी सत्यशोधक समाजाची तळपती तलवातळपती तलवार म्हणून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, हुंडा विरोधी ,बालविवाह, विधवा केशवपन,हुंडा प्रथा, ब्राह्मणेतर चळवळीत सक्रिय सहभाग आणि त्यांच्या लिखाणातून तसेच भाषणातून सामाजिक सुधारणांवर जोर दिला आणि देवळांमधील पुरोहितशाही यांच्याविरुद्ध लढा दिला. त्यांच्या लेखन आणि वक्तृत्वातून त्यांनी रूढी-परंपरांचा तीव्र निषेध केला.

    प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांनी मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलने, लेखन आणि वक्तृत्वातून योगदान दिले. त्यांचे मत होते की, धर्माने माणसाला माणुसकीने वागण्याची सवलत द्यावी; अन्यथा तो धर्म माणसांनी का जुमानावा.

     प्रबोधनकारांनी पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व यांखेरीज नाटककार, चित्रपट संवादलेखक, अभिनेता, संगीतज्ञ, शिक्षक, छायाचित्रकार आणि टंकलेखक अशा अनेक क्षेत्रांत काम केले.
त्यांनी सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मार्गदर्शक होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट या ज्येष्ठ नेत्यांना संयुक्त महाराष्ट्राचे पंचायतन म्हटले गेले. हे कोणत्याही पक्षात नव्हते. त्यांनी स्वतंत्रपणे संपूर्ण आंदोलनावर वचक ठेवला. हे आंदोलन लढलं जात असताना प्रबोधनकार सत्तरीच्या जवळ होते. पण त्यांनी व्याख्यानांचा धुरळा उडवला. त्यांची लेखणी तर बेडरपणे चालत होती. त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरली. 
    प्रबोधनकारांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, ज्याची प्रेरणा प्रबोधनकारांच्या विचारांतून मिळाली.
त्यांचे दत्तकपुत्र रामभाऊ हरणे यांनीही सामाजिक कार्यात योगदान दिले आणि प्रबोधनकारांचे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंत पोहोचवले.  
प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने पुण्यात प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन आयोजित केले जाते, ज्यामध्ये त्यांच्या विचारांचा प्रसार केला जातो.
    प्रबोधंकार ठाकरे यांचे समग्र साहित्य हे मराठी, हिन्दी , इंग्रजी आणि गुजराती भाषेत उपएलबीडीएच आहेत. 
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 











Articles / लेख 






YouTube Video/ व्हिडिओ 





Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :








Research / संशोधन





* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.




Monday, October 9, 2023

महर्षी वाल्मिकी जयंती ( Maharshi Walmiki Jayanti )


महर्षी वाल्मिकी जयंती

Birth Anniversary of Maharshi Walmiki 


२८ ऑक्टोबर/ 28 October  
आश्विन पौर्णिमा



    "महर्षि वाल्मिकी" यांना   "रामायण महाकाव्याचे पारंपारिक लेखक म्हणून ओळखले जाते.महर्षी वाल्मिकी यांना आद्य कवी असेही म्हटले जाते. ते संस्कृत मधील आणि जगातील पहिल्या श्लोकाचे रचयिता मानले जातात. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाची रचना केली ज्यात ७ कांड आणि २४००० श्लोक आहेत…. अनुष्टुभ छंद या शास्त्रीय संस्कृत छंदात रामायणाची रचना केली गेली आहे. वाल्मिकी जयंती पवित्र धर्मग्रंथ रामायण लिहिणारे प्रसिद्ध ऋषी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती स्मरणार्थ साजरी केली जाते.वाल्मिकी श्रीरामाचे खूप मोठे भक्त होते. वाल्मिकी जयंती हा प्रगत दिवस म्हणूनही साजरा केला जातो. हिंदु धर्मात वाल्मिकी जयंतीचे खूप महत्त्व आहे. या वर्षी वाल्मिकी जयंती आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. दरम्यान, वाल्मिकी जयंतीचे पौराणिक महत्त्व जाणून घेऊयात.

( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


 Books/पुस्तकं : 

1) वाल्मीकिरामायंकोश राजकुमार राय
2) Srimad Valmiki Ramayana by T.r.krishnacharya
3) मद्वाल्मिकी रामायण by महर्षि वाल्मिकी
4) Sankshipta Valmikiramayanam (second Edition) by Ramchandra Govind &son, Kalvadevi Road Mumbai
5) Sankshipta Valmikiramayanam (second Edition) by Ramchandra Govind &son, Kalvadevi Road Mumbai
6) श्री संत तुलसीदास कृतरामायण बालकांड

Other Online Resource 

1) Maharishi Valmiki Jayanti 2023

2) Valmiki Jayanti 2023 : कोण होते महर्षी वाल्मिकी, सम्पूर्ण माहिती जाणून घ्या

3) वाल्मिकी ऋषी - विकिपीडिया


Youtube Videos

1) Tulsi Ramayana | Shri Ramcharitmanas | Sundarkand

2) Ramanand Sagar's Ramayan with English Subtitles - All Episodes


Ph.D.Thesis

1) Valmiki Ramayan ka samalochnatmak adhyayan

2) A critical analysis of valmiki ramayana and its implications to educational leadership

3) The study of values inherent from the ramayana written by maharshi valmiki

4) The contribution of subsidiary characters in the Valmiki Ramayana


Reference: ( Online available through Google, archive.org, Shodhganga , Google Scholar, and other online sources). 








Monday, July 24, 2023

National Education Policy 2020

 



     

    भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ( NEP 2020 ), जे भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी सुरू केले होते, ते भारताच्या नवीन शिक्षण पद्धतीची रूपरेषा देते. [१] नवीन धोरण मागील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, १९८६ च्या जागी आहे .  हे धोरण ग्रामीण आणि शहरी भारतातील प्राथमिक शिक्षण ते उच्च तसेच व्यावसायिक प्रशिक्षणासाठी एक व्यापक आराखडा आहे. 2030 पर्यंत भारताच्या शिक्षण पद्धतीत परिवर्तन करण्याचे धोरणाचे उद्दिष्ट आहे.
       राष्ट्रीय शैक्षणिक धोरि-2020 शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी, शैक्षणिक संस्ांमधील सहयोग सुलभ करण्यासाठी नाविन्यपुिण प्रशासन संरचनेची क्षमता व  फायदे ओळखून विद्यमान संलग्नता प्कारणाली  टप्या टप्याने  नाविन्यपूर्ण  बहुविद्याशाखीय शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक  लवचिकता  प्रदान करण्याची गरज अधोरखित करते.

  

खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )



NEP Draft







BOOKS/ पुस्तक:




Online उपलब्ध व्हिडिओ:





Online वैचारिक संवाद 





Articles / लेख 

















Research / संशोधन



















Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :



* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.



Saturday, April 1, 2023

Sant Tukdoji Maharaj


संत तुकडोजी महाराज

 Sant Tukdoji Maharaj



30 एप्रिल  1909 - 11 ऑक्टोबर  1968


        तुकडोजी महाराज यांचे  पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे,  पण संपूर्ण महाराष्ट्र  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.


( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 


Articles / लेख 


Research / संशोधन

1) Vandaniy rashtrasant tukdoji maharaj yanchya bhajnateel sangiteek saundary tatwa

2) Rashtra Sant Tukdoji Maharaj Vyakti Aani Karya

3) Rastryasant tukdoji maharaj evam acharya vinobha bhave ki vichardhara ka tulnatmak adhyaan

4) Rashtrasant Tukdoji Maharaj yanchi Gramgeeta ek chikitsak abhyas


YouTube Video/ व्हिडिओ 

1) Rashtrasant Tukdoji Maharaj Vichar

2) Tukdyadas Youyube Channel

3) Ya Zopdit Mazya - Saint Tukdoji Maharaj Songs


Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :

1) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता

2) “राष्ट्रसंत” तुकडोजी महाराज की जीवनी | Tukdoji Maharaj Information

3) तुकडोजी महाराज - मराठी विश्वकोश

4) तुकडोजी महाराज

5) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संपूर्ण माहिती

6) Rashtrasant Tukdoji Maharaj Information in Marathi

7) तुकडोजी महाराज - मुक्त ज्ञानकोश


* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.















Tuesday, January 10, 2023


 



बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे




 ( 23 जानेवारी 1926 - 17 नोव्हेंबर  2012  )


    बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. महाराष्ट्रामधील सर्व मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी संयुक्त मराठी आंदोलनात त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांनी 1950 च्या काळात मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनविण्यासाठी अनेक कार्य केले.


( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


Books/ पुस्तकं 






Articles / लेख 




YouTube Video/ व्हिडिओ 



Other Online Sources/ इतर संदर्भ स्रोत :



Research / संशोधन






* References : Available on Google Open Access Sites, Blog, YouTube, Wikipedia and other OA Sources  etc.







Monday, January 9, 2023

स्वामी विवेकानंद Swami Vivekananda

 

.
स्वामी विवेकानंद  १२ जानेवारी १८६३ - ४ जुलै १९०२)


स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारतीय विचारवंतांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ते एक प्रमुख तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि परदेशात वेदांत तत्त्वज्ञानाचे सर्वात यशस्वी समर्थक होते. त्यांनी हिंदू पुनरुत्थानवादी चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताच्या भूमीत जन्मलेले एक अलौकिक व्यक्तिमत्वाचे महापुरुष म्हणून स्वामी विवेकानंदांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाद्वारे आणि विविध विषयांच्या सखोल अभ्यासाद्वारे सा-या जगाचे लक्ष वेधले. 
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत"  या संस्कृत वाक्याचा अर्थ मराठीत या संस्कृत वाक्याचा अर्थ मराठीत "  उठा जागे व्हा आणि श्रेष्ठ /उत्तम गुरुजना किवा ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका " असा संदेश देत युवांच्या मनात नवचेतना जागृत करणारे युगप्रवर्तक, महान संन्यासी स्वामी विवेकानंद. विवेकानंदांचे विचार केवळ भारतभूमीपुरते मर्यादित नव्हते, तर अवघ्या जगाला त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. स्वामीजींचे विचार कालातीत आहेत. म्हणून  स्वामी विवेकानंदांची जयंती  ‘राष्ट्रीय युवा दिन म्हणून सुधा साजरी करतात .


( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )


निवडक ग्रंथ :

1) व्यक्तित्व का विकास

2) कर्मयोग एलआर. स्वामी विवेकानंद

3)हिंदू धर्म ले. स्वामी विवेकानंद

लेख :

1) चिरंतन स्फूर्तीचा स्रोत स्वामी विवेकानंद

2)स्वामी विवेकानंदांचे जीवन, कार्य अभ्यासणे तरुणांसाठी प्रेरणादायी

3) स्‍वामी विवेकानंद आणि युवक

4)माणुसकी हाच सगळ्यांत मोठा धर्म आहे

5) स्वामी विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार





संशोधन :


Other Online Resources :

1)स्वामी विवेकानन्द


3) स्वामी विवेकानंद


Youtube Video :

1)स्वामी विवेकानंद जीवनी