भारत 2020 नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध या पुस्तकाचे लेखक डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि वाय.एस.राजन आहेत. तर अभय सदावर्ते यांनी इंडिया 2020 व्हिजन फोन थे न्यू मिलेनियम या पुस्तकाचे मराठी अनुवाद केले आहे. राजहंस प्रकाशन /अल्टिमेट असोसिएट्स यांनी 2006 मध्ये प्रकाशित केलेले हे पुस्तक अतिशय लोकप्रिय आहे.
हे पुस्तक डॉ. कलामांच्या भारताबद्दलच्या एका अविचल विश्वासानं काठोकाठ भरलेलं आहे. 'हा देश आर्थिक समृद्धीकडे चालला आहे, वीसेक वर्षांत समृद्ध, विकासित व प्रगत देशांनिकट जाणार आहे', असा त्यांचा अंदाज आहे. आपला आशावाद कोणत्या निकषांवर आधारलेला आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. त्यांत भारतातील उद्योगधंदे, कृषी उत्पादनं, त्यांचं वितरण, वीज उत्पादनं, रस्ते बांधणी, बंदरांचा विकास, माहिती संचार, दळणवळणाची साधनं, आरोग्य, शिक्षणपद्धती, पाणी नियोजन इत्यादी समृद्ध जीवनाशी संबंधित घटकांविषयी विस्तृत चर्चा आहे. स्वत:च्या विधानाला पूरक म्हणून दोन्ही लेखकांनी ठिकाठिकाणी सुस्पष्ट कोष्टकं व संकालित माहितीचं विवरण केलं आहे. पारंपरिक ज्ञानाचा पुन्हा शोध घ्यावा, असं त्यांचं आग्रही मत आहे.
'इंडिया २०२०' हा भविष्यवेध आहे. सूचित काल प्रत्यक्ष उजाडेपर्यंत अंदाज विवाद्य होऊ शकतो. कोंब जमिनीच्या वर येण्यापूर्वी बी जमिनीखाली रुजत असतं. वरुन बघताना काहीच घडत नाही, असं वाटतं. पण या वरवरच्या 'न घडण्या'च्या अंतर्यामी खूप काही घडत असतं! जो कोण ते 'बघू' शकेल, तो भविष्य सांगत नसतो, प्रत्यक्ष घडणार्या घडामोडींचे कल नीटपणे तपासले तर ते आपल्याला कुठपर्यंत नेऊन पोचवतील, एवढयाचाच तो अंदाज करत असतो. कलामांनी तेच केलं आहे.
माझा भारत उज्वल भारत या युकांसाठी प्रेरणादायी भाषणच पुस्तकरूपात संकलन सृजन पाल सिंग यांनी केले आहे . तर प्रणव सुखदेव यांनी अनुवादित केलं आहे. रोहन प्रकाशन यांनी २०१६ मध्ये प्रकाशित हे ग्रंथ आहे.
तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच डॉ. कलाम आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच! कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते.
या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत...उज्ज्वल भारत !
द सायंटिफिक इंडीयन
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि वाय.एस.राजन द सायंटिफिक इंडियन हे पुस्तक म्हणजे राष्ट्र्पर्मी डॉ. कलाम यांचा विज्ञान संवाद होय. डॉ. प्रकाश भावे यांनी अळूवडीत केलेलं हे पुस्तक अमेय प्रकाशन यांनी 2011 मध्ये प्रकशित केलं आहे. अवकाश शोध, उपग्रह तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र विकास, पृथ्वी आणि समुद्रातील संसाधने. , बायोस्फीअर, अन्न उत्पादन, उर्जा आणि पाणी साठवण, आरोग्य सेवा आणि संप्रेषणे अशी काही नावे दिली आहेत. प्रत्येक बाबीसाठी, लेखक जागतिक व्यासपीठावर तसेच भारतीय घडामोडींवर अलीकडील प्रगतीचा संदर्भ प्रदान करतात. आपला भविष्य काळ आव्हानांनी भरलेला आहे. तसेच नव्या संधीनाही वाव असेल फक्त ज्ञानाचा प्रसार करणे हे विज्ञानधिष्टीत भारतीयाच काम आहे अशी अपेक्षा डॉ. कलाम यांना वाचकांकडून आहे.
विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि सृजन पाल लिखित विज्ञानाच्या उज्वल वाट या ग्रंथाचे अनुवादक प्रणव सुखदेव आहेत. मिहला प्रकाशन यांनी २०१५ मध्ये प्रकाशित हे ग्रंथ विदयार्थांसाठी बहुमोल मार्गदर्शन आहे.
भविष्याच्या पोटात काय दडलेय हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. त्यातून विज्ञानातील भविष्य काय असेल, ते गूढच! मात्र दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकात भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
सृजन पाल सिंग हे पुस्तकात भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सृजन पाल सिंग हे पुस्तकाचे सहलेखक असून, प्रणव सखदेव यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
रोबोटिक्स, विमानविद्या, अंतराळविज्ञान, मेंदूविज्ञान, मटेरियल, सायन्स आणि जीवाश्मविज्ञान या विषयांवर डॉ. कलाम यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे.
प्रश्नोत्तरे, पालकांसाठी टिप्स, आकृत्या, तक्ते, छायाचित्रे यांचा चपखल वापर करून विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर मोठ्यांनाही उत्कंठा वाटेल अशी पुस्तकाची रचना आहे. सुबोध, ओघवती भाषा हे लेखनाचे वैशिष्ट्य होय.
माझी जीवनयात्रा : स्वप्ने साकारताना
डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम लिखित माझी जीवन यात्रा हे पुस्तक सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलं आहे तर, मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी२०१५ मध्ये प्रकाशित हे पुस्तक म्हणजे सर्व वाचकांना त्यांची स्वप्न जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पडेल असेच आहे.
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढनिश्चय, धाडस, चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे.
या जीवनयात्रेदरम्यानच्या आठवणी, भेटलेली माणसं, ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्याण व्यक्ती, त्यांचे जिवलग, मार्गदर्शक, गुरू या सगळ्यांबद्दल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहीलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहे.
डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम लिखित " टर्निग पॉईंट हे पुस्तक ग्निपंख' नंतर डॉ.कलाम यांचं सर्वात गाजलेले पुस्तक ते म्हणजे"टर्निंग पॉईंट". अग्निपंख नंतर चा प्रवास यात सांगितले आहे. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना २००५ साली राष्ट्रपतीपदाची संधी चालून आली. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी देशातल्या कितीतरी तरुणांशी संवाद साधला. डॉ. अब्दुलकलाम यांच्या आधीच्या 'विंग्स ऑफ फायर' या पुस्तकाचे हे एक सातत्य आहे. कलाम यांचे कारकीर्द आणि अध्यक्षपदाच्या नंतरचे काही अनुभव येथे आहेत.
त्या काळातले काही अनुभव, भाषणे यांचा समावेश 'टर्निग पॉइंट्स' पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.