Wednesday, October 14, 2020

Book Exhibition on the Occasion of Birth Anniversary of Dr.A.P.J. Abdul Kalam

 


"वाचन प्रेरणा दिन"
15 ऑक्टोबर 2024


    डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिवस 15 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देश " वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करत  आहे.  वाचन प्रेरणा दिनानिमित्त ऑनलाईन ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम वसंतराव नाईक महाविद्यालय ग्रंथालयाने प्रयोजन केले आहे. या उपक्रमात महाविद्यालयात उपलब्ध " डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम " लिखित आणि इतर लेखकांचे त्यांच्या वरील पुस्तकांचेच  समावेश या ऑनलाईन  ग्रंथप्रदर्शनात केला आहे. COVID - 19 च्या काळात या ऑनलाइन ग्रंथ प्रदर्शनची कल्पना  सुचली आणि ती आंमलात आणली. या ब्लॉग द्वारे दरवर्षी यात नाविन्यपूर्ण लेख आणि संदर्भ समाविष्ठ केले आहे. 

 यात मूळ पुस्तकाचे समोरील पृष्ठ ,शीर्षक पृष्ठ आणि पार्श्व  पृष्ठ चे चित्र देऊन ते पुस्तक वाचकांनी का वाचावेत यासाठी पुस्तकाचा परिचय आणि पुस्तकाचे ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत. यामुळे वाचकांना त्यांची वाचन सवयीत वृद्धिंगत होईल यात शंका नाही
चला आता आपण ऑनलाईन ग्रंथप्रदर्शनाचे मनसोक्त लाभ घेऊ.






अदम्य जिद्द 

 
        अदम्य जिद्द हा ग्रंथ भारताचे माजी राष्टपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे अनमोल विचारधन आहे. या ग्रंथाचे अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे तर मेहता पब्लिकेशन हाऊस ,पुणे यांनी ऑक्टोबर 2008 मध्ये प्रकाशित केलेले  हा  ग्रंथ आहे. 

        अदम्य जिद्द' हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे. 'अदम्य जिद्द' हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणा-या एका थोर, द्रष्ट्या नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यप्रेमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार ! अनेक घटना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यांतून त्यांच्या व्यक्तित्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. हे अनमोल विचारधन सर्वांनाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे.



अग्निपंख 

 
        " अग्निपंख" हे  भारताचे माजी राष्टपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे  आत्मचरित्र आहे. या ग्रंथासाठी अरुण तिवारी यांची साहाय्य केले तर अनुवाद माधुरी शानबाग यांनी केले आहे राजहंस प्रकाशन ,पुणे यांनी प्रकाशित केलेले  हा  ग्रंथ आहे. 

        तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतारली आहे.

        अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.



'महाशक्ती भारत'

 
            महाशक्ती भारत' हे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम आणि वाई सुंदर राजन लिखित पुस्तक हिंदी भाषेत प्रकाशित आहे. प्रभात प्रकाशन, दिल्ली यांनी २००५ मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक आहे. 
     'महाशक्ती भारत' हे  पूर्वी प्रकाशित झालेल्या 'इंडिया २०२० -नव्या शस्त्रकाचा भविष्यवेध या पुस्तकावर आधारित आहे. 
        सध्याच्या दृष्टीकोनातून, जेव्हा भारतीय युवा शक्तीला विकासाच्या विविध महत्वाच्या क्षेत्रात - कृषी, उद्योग, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान या क्षेत्रांत काम करण्याची संधी आहे तेव्हा या पुस्तकाचे महत्त्व तुलनेने वाढते. या पुस्तकाची सुरूवात अत्यंत महत्त्वाच्या आणि मार्मिक प्रश्नाने झाली - भारत विकसित देश होऊ शकतो का? याअंतर्गत, आपल्या सामर्थ्य आणि मूलभूत कमकुवत्यांचे विश्लेषण केले गेले आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक देशातील लोकांकडून अशी आशा व्यक्त केली जात आहे की, त्यांनी भारत एक विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दीष्टेसाठी एकत्रितपणे वचनबद्ध राहिले पाहिजे.
        महाशक्ती भारत हे पुस्तक प्रामुख्याने देशातील तरुणांसाठी मार्गदर्शक म्हणून तयार केले आहे. प्रत्येक अध्यायात संबंधित उद्योग क्षेत्राला लक्ष्य कसे ठरवायचे आणि त्यावर कार्य कसे करावे याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. देशातील काना कोपऱ्यापर्यंत  दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपकरणेही ठेवण्यात आली आहेत. 'सर्वांसाठी आरोग्य सुविधा' आणि 'पायाभूत सुविधा विकास' या अंतर्गत, विकसित देशासाठी मूलभूत निकष मानले जाऊ शकतील असे दोन पैलू. 'सर्वांसाठी आरोग्य सुविधा' आणि 'पायाभूत सुविधा विकास' या अंतर्गत, विकसित देशासाठी मूलभूत निकष मानले जाऊ शकतील असे दोन पैलू. ‘वास्तववादी दृष्टिकोन’ या शेवटच्या अध्यायात भारताच्या सध्याच्या विकासाच्या कलमावर निर्णायक चर्चा केली आहे. 'डेव्हलप्ड इंडिया ड्रीम ऑफ २०२०' हे उद्दीष्ट साध्य करण्याचा विश्वास असलेल्या सर्व देशवासियांना  हे ग्रंथ समर्पित आहे. 



दीपस्तंभ 

 
        दीपस्तंभ : जीवन प्रयोजन विषयक संवाद  हा पुस्तकाचे लेखक डॉ. ए.पी.जे.  अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी आहेत. अनुवादक कमलेश वालावलकर हे आहेत. राजहंसह प्रकाशन ,पुणे यांनी २००६ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. 
        हे पुस्तक म्हणजे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी या दोघांमधला त्यांच्या भेटी दरम्यान मधील संवाद आहे. हे पुस्तक तीन भागात विभागले आहे. पहिला भाग आंतरिक अनुभावाच्या संकल्पनेशी निगडित आहे. दुसऱ्या भागात आपल्या देशातील महात्म्यांच्या सारतत्वाविषयी उहापोह केला आहे. 
तिसऱ्या भागात आत्म्यांचा प्रवास आणि त्यांच्या विविध अविष्कारांसह उदाहरण दिले आहेत. 



झेप अवकाशी अग्निपक्षाची 
    
 

        झेप अवकाशी अग्निपक्षाची या पुस्तकाचे लेखक आहेत प्राचार्य व. न. इंगळे. 2004 मध्ये साकेत प्रकाशन औरंगाबाद यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला वसंत गोवारीकर, माजी संचालक ,विक्रम साराभाई स्पेस सेंटर .माजी कुलगुरू ,पुणे विद्यापीठ,  पुणे  यांचे प्रास्ताविक आहे. 
        हे पुस्तक म्हणजे डॉ.कलाम यांची जीवनगाथा आहे.  त्यांचे आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न, उपयशातून यशाकडे, अंतराळातील संशोधन, यशाची वाटचाल इत्यादी अनेक पैलूंवर छोट्या छोट्या कथा स्वरूपात हे पुस्तक वाचकांसमोर आहे. डॉ. अब्दुल कलम यांच्यावरच हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण आणि परिश्रमपूर्वक लिहिलं आहे. डॉ. कलामांच्या थोर देशप्रेमी,कर्तबगार व्यक्तिमत्वाचं दर्शन या पुस्तकातून होत. 



Spirit of India
 

        ए. पी. जे .अब्दुल कलाम यांनी लिहिलेले "स्पिरीट ऑफ इंडिया हे  "युवा आणि देश यांच्या संघटनेकडे कडे लक्ष वेधणारे  पुस्तक आहे. राजपाल अँड सन्स यांनी 2010 मध्ये प्रकाशित केलेले  हे पुस्तक समकालीन भारतातील भारतीय तरुणांच्या इच्छांबद्दल, समस्यांविषयी आणि स्वप्नांच्या आसपास फिरते आहे. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांहून अधिक काळ बदलत गेल्याने, तरुणांमधील रहिवाशांची संख्या वाढत जास्तीत जास्त प्रशिक्षण, विकासाची विनंती आणि मोठ्या प्रमाणात प्रगतीची आवश्यकता आहे. वैयक्तिक आकांक्षाच्या या हंगामात, एक पुस्तक म्हणून भारतीय भाषेचा भाव या पुस्तकात लिहिलेला आहे. दुर्दैवी कायदेविषयक मुद्दे, आर्थिक करार आणि राष्ट्रीय मर्यादेमध्ये अस्वस्थ करणारे प्रभाव पडत गेले आहेत, ज्यामुळे राष्ट्रत्व होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लेखक प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी अस्सल चिंता दाखवते. हे पुस्तक अतिशय सोप्या इंग्रजी भाषेत आणि देखण्या मांडणीतील आहे.



भारत  2020
नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध
 


        भारत  2020 नव्या सहस्त्रकाचा भविष्यवेध या पुस्तकाचे लेखक डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि वाय.एस.राजन आहेत. तर अभय सदावर्ते यांनी  इंडिया 2020 व्हिजन फोन थे न्यू  मिलेनियम या पुस्तकाचे मराठी अनुवाद केले आहे. राजहंस प्रकाशन /अल्टिमेट असोसिएट्स यांनी 2006 मध्ये प्रकाशित केलेले हे पुस्तक अतिशय लोकप्रिय आहे. 
        हे पुस्तक डॉ. कलामांच्या भारताबद्दलच्या एका अविचल विश्वासानं काठोकाठ भरलेलं आहे. 'हा देश आर्थिक समृद्धीकडे चालला आहे, वीसेक वर्षांत समृद्ध, विकासित व प्रगत देशांनिकट जाणार आहे', असा त्यांचा अंदाज आहे. आपला आशावाद कोणत्या निकषांवर आधारलेला आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. त्यांत भारतातील उद्योगधंदे, कृषी उत्पादनं, त्यांचं वितरण, वीज उत्पादनं, रस्ते बांधणी, बंदरांचा विकास, माहिती संचार, दळणवळणाची साधनं, आरोग्य, शिक्षणपद्धती, पाणी नियोजन इत्यादी समृद्ध जीवनाशी संबंधित घटकांविषयी विस्तृत चर्चा आहे. स्वत:च्या विधानाला पूरक म्हणून दोन्ही लेखकांनी ठिकाठिकाणी सुस्पष्ट कोष्टकं व संकालित माहितीचं विवरण केलं आहे. पारंपरिक ज्ञानाचा पुन्हा शोध घ्यावा, असं त्यांचं आग्रही मत आहे.
        'इंडिया २०२०' हा भविष्यवेध आहे. सूचित काल प्रत्यक्ष उजाडेपर्यंत अंदाज विवाद्य होऊ शकतो. कोंब जमिनीच्या वर येण्यापूर्वी बी जमिनीखाली रुजत असतं. वरुन बघताना काहीच घडत नाही, असं वाटतं. पण या वरवरच्या 'न घडण्या'च्या अंतर्यामी खूप काही घडत असतं! जो कोण ते 'बघू' शकेल, तो भविष्य सांगत नसतो, प्रत्यक्ष घडणार्‍या घडामोडींचे कल नीटपणे तपासले तर ते आपल्याला कुठपर्यंत नेऊन पोचवतील, एवढयाचाच तो अंदाज करत असतो. कलामांनी तेच केलं आहे.




        माझा भारत उज्वल भारत या युकांसाठी प्रेरणादायी भाषणच पुस्तकरूपात संकलन सृजन पाल सिंग यांनी केले आहे . तर प्रणव सुखदेव  यांनी अनुवादित केलं आहे. रोहन प्रकाशन यांनी २०१६ मध्ये प्रकाशित हे ग्रंथ आहे. 

    तरुणांना घडवणं हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठीच डॉ. कलाम आयुष्यभर देशा-परदेशांत तरुणांशी संवाद साधत फिरले. आणि म्हणूनच की काय, नियतीनेही त्यांना मृत्यू दिला तो विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच! कलाम आता आपल्यात नसले, तरी ते विचाररूपाने कायमच आपल्यात असणार आहेत, त्यातून आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यांचे विचार अक्षररूपात आपल्यासमोर यावेत यासाठी कलाम यांचा निकटवर्तीय विद्यार्थी आणि सहलेखक सृजन सिंग पाल यांनी त्यांच्या भाषणातील निवडक उतार्यांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
    प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपणूक, जीवनाविषयक तत्त्वज्ञान, स्वप्नं पाहणं आणि परिश्रमाचं महत्त्वं आदी विषयांवरच्या या भाषणांमध्ये कलाम आपल्या आयुष्यातले अनुभव, कथा-कहाण्या आपल्याशी शेअर करतात. त्यातून आपल्याला एक संदेश मिळतो आणि त्यानुसार कृती करायची प्रेरणा मिळते.
    या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत – खास करून तरुण पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही शब्दांजली माझा भारत...उज्ज्वल भारत !



 सायंटिफिक इंडीयन

 

        डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि वाय.एस.राजन  द सायंटिफिक इंडियन हे पुस्तक म्हणजे राष्ट्र्पर्मी डॉ. कलाम यांचा विज्ञान संवाद होय. डॉ. प्रकाश भावे यांनी अळूवडीत केलेलं हे पुस्तक अमेय प्रकाशन यांनी  2011 मध्ये प्रकशित केलं आहे. अवकाश शोध, उपग्रह तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र विकास, पृथ्वी आणि समुद्रातील संसाधने. , बायोस्फीअर, अन्न उत्पादन, उर्जा आणि पाणी साठवण, आरोग्य सेवा आणि संप्रेषणे अशी काही नावे दिली आहेत. प्रत्येक बाबीसाठी, लेखक जागतिक व्यासपीठावर तसेच भारतीय घडामोडींवर अलीकडील प्रगतीचा संदर्भ प्रदान करतात. आपला भविष्य काळ आव्हानांनी भरलेला आहे. तसेच नव्या संधीनाही वाव असेल फक्त ज्ञानाचा प्रसार करणे हे विज्ञानधिष्टीत भारतीयाच काम आहे अशी अपेक्षा डॉ. कलाम यांना वाचकांकडून आहे. 




विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा

 

        डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि सृजन पाल लिखित विज्ञानाच्या उज्वल वाट या ग्रंथाचे अनुवादक प्रणव सुखदेव आहेत. मिहला प्रकाशन यांनी २०१५ मध्ये प्रकाशित हे ग्रंथ विदयार्थांसाठी बहुमोल मार्गदर्शन आहे. 
        भविष्याच्या पोटात काय दडलेय हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. त्यातून विज्ञानातील भविष्य काय असेल, ते गूढच! मात्र दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकात भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

        सृजन पाल सिंग हे पुस्तकात भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सृजन पाल सिंग हे पुस्तकाचे सहलेखक असून, प्रणव सखदेव यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
रोबोटिक्स, विमानविद्या, अंतराळविज्ञान, मेंदूविज्ञान, मटेरियल, सायन्स आणि जीवाश्मविज्ञान या विषयांवर डॉ. कलाम यांनी या पुस्तकात भाष्य केले आहे.

        प्रश्नोत्तरे, पालकांसाठी टिप्स, आकृत्या, तक्ते, छायाचित्रे यांचा चपखल वापर करून विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर मोठ्यांनाही उत्कंठा वाटेल अशी पुस्तकाची रचना आहे. सुबोध, ओघवती भाषा हे लेखनाचे वैशिष्ट्य होय. 



माझी जीवनयात्रा : स्वप्ने साकारताना 



        डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम लिखित माझी जीवन यात्रा हे पुस्तक सुप्रिया वकील यांनी अनुवादित केलं आहे तर, मेहता पब्लिशिंग हाऊस  यांनी२०१५ मध्ये प्रकाशित हे पुस्तक म्हणजे सर्व   वाचकांना त्यांची स्वप्न जाणून घेण्यास व ती साकार करण्यासाठी परिश्रम करण्यास भाग पडेल असेच आहे. 

        देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तिदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढनिश्चय, धाडस, चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे.

       या जीवनयात्रेदरम्यानच्या आठवणी, भेटलेली माणसं, ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्याण व्यक्ती, त्यांचे जिवलग, मार्गदर्शक, गुरू या सगळ्यांबद्दल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहीलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक, स्फूर्तिदायी आणि प्रेरक आहे.





    

        डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम लिखित " टर्निग पॉईंट हे पुस्तक ग्निपंख' नंतर डॉ.कलाम यांचं सर्वात गाजलेले पुस्तक ते म्हणजे"टर्निंग पॉईंट". अग्निपंख नंतर चा प्रवास यात सांगितले आहे. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना २००५ साली राष्ट्रपतीपदाची संधी चालून आली. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी देशातल्या कितीतरी तरुणांशी संवाद साधला. डॉ. अब्दुलकलाम यांच्या आधीच्या 'विंग्स ऑफ फायर' या पुस्तकाचे हे एक सातत्य आहे. कलाम यांचे कारकीर्द आणि अध्यक्षपदाच्या नंतरचे काही अनुभव येथे आहेत.
त्या काळातले काही अनुभव, भाषणे यांचा समावेश 'टर्निग पॉइंट्स' पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. 



मी देशाला काय देऊ शकतो

        देशातील सर्वात प्रिय शिक्षकांच्या स्मरणार्थ हे पुस्तक सृजन पाल सिंग यांनी लिहिलेले आहे तर डॉ. वृंदा चापेकर यांनी अनुवादित केले आहे. मनोविकास प्रकाशन यांनी २०१७ मध्ये हे पुस्तक प्रकशित केलं आहे.

        डॉ कलाम यांना बर्‍याचदा शिक्षक म्हणून उत्कृष्ट म्हणून ओळखले जाते, ज्यांचे शब्द, विचार आणि आयुष्य हे अनेक प्रकारे धडे होते.
हे पुस्तक त्यांचे विद्यार्थी श्रीजन पाल सिंह यांनी समर्पित केले आहे, ज्यांनी त्याच्या आयुष्याच्या         शेवटच्या दिवसापर्यंत त्याच्याबरोबर जवळून काम केले. आपल्या मार्गदर्शकाची मूल्ये, शपथ व तरुणांना संदेश सांगून श्री. डॉ. कलाम यांनी वर्गातून शिकवलेले धडे सुंदरपणे शेअर करतात. त्यांच्या रोजच्या दिनचर्या, प्रवास, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवरील प्रतिबिंब, किस्से आणि प्रश्न यावर डोकावून पाहणारे हे पुस्तक वाचकांना समकालीन काळातील महान भारतीयांशी जवळचे आणि वैयक्तिक बनविण्यात मदत करते.
        बर्‍याच थोड्या ज्ञात कथा आणि कधीही न पाहिलेली छायाचित्रे, तसेच क्लासिक डॉ कलाम यांची विशिष्ट अभिव्यक्ती असलेले हे हृदय-वार्मिंग संस्कार एखाद्या प्रिय नेत्याच्या शब्द आणि कृतीला प्रेरणा देईल आणि ज्ञान देईल.



Guiding Souls: Dialogues on the Purpose of Life
 

        हे पुस्तक मानवी अस्तित्वाच्या विविध पैलू तसेच अब्दुल कलाम यांना त्याच्या

सुरुवातीच्या काळात प्रेरणा देणारी अंतर्दृष्टी प्रदान करतात.त्याच्या एका प्रोटीससह संभाषणातून कथन येते जे महत्त्वपूर्ण योगदान देते. पुस्तकातील हे अंतिम विधान 'एसेन्स' मध्ये वर्णन केले आहे: "

    अब्दुल कलाम आणि त्याचे मित्र आणि विंग्स ऑफ फायरचे सह-लेखक प्रो अरुण के. तिवारी हे पुस्तक जीवनाकडे आध्यात्मिक दृष्टिकोन सांगते. तरुणांच्या निर्दोष सर्जनशीलतेस आवाहन करणारे, जागतिकीकरणाच्या टोकाचे-हायपे आणि हूप-ला आणि जगाला संघर्षाचे नाट्यस्थान म्हणून पाहण्याची निराशा-या दोन्ही गोष्टींना नकार देऊन हे पुस्तक उत्क्रांतीस मदत करण्याचे कार्य करीत मानवतेच्या अंतिम ध्येय आणि उद्दीष्टाचे वर्णन करते.


असे घडले डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम 


        असे घडले डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम हे पुस्तक   रेणू सैनी लिखित असून , प्रणव कुलकर्णी आणि स्नेहल चिपटे हे अनुवादक आहेत. साकेत प्रकाशन ,औरंगाबाद यांनी २०१८ मध्ये प्रकाशित केलेले हे पुस्तक आहे.
        भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे देश म्हणून जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. विज्ञानक्षेत्रात अत्युच्च पदावर काम करत असतानाच त्यांची स्वत:मधील याचीही काळजी घेतली. साधी राहणी असलेले भारताचे अत्यंत प्रतिभावान राष्ट्रपती म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांच्या चेहर्यावर सतत विलसणार्या प्रसन्न आणि समाधानी हास्याची छबी इतिहासात अजरामर झाली आहे. अशा या सार्यांच्याच लाडक्या असलेल्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलामांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंगांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. कलामांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व नेमकं कसं घडत गेलं, हे वाचकांसमोर त्यातून अलगद उलगडेल. त्यांनीच भारतीय तरुणाईला दाखवलेलं ‘मिशन 2020; भारत एक जागतिक महासत्ता’ हे स्वप्न साकारण्यासाठी आजची तरुण पिढी घडवण्यात हे पुस्तक नक्कीच मोलाचं योगदान देऊ शकेल अशी आशा आहे.




ए.पी जे अब्दुल कलाम गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया


        माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या या पुस्तकाचा मनोज अंबिके यांनी अनुवाद केला आहे. तर मिरर पब्लिशिंग पुणे यांनी २०१६ मध्ये हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
        'मतदानाचा अधिकार ' अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता,' असे डॉ. कलाम लिहितात.
      प्रत्येक मतदाराने आपला मताधिकार काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक कसा बजावावा, याचे मार्गदर्शन ते करतात. सर्जनशील, नेतृत्व, सुशासन, ई-गव्हर्नन्स, माहिती अधिकार, पारदर्शक कारभार आदी घटकांचा त्यांनी उहापोह केला आहे.




उद्दिष्ट्य तीन अब्ज  



           उद्दिष्ट्य तीन अब्ज हा ग्रंथ डॉ. ए .पी .जे . अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंग लिखित आहे. शुभदा पटवर्धन यांनी अनुवादित हा ग्रंथ मनोविकास प्रकाशन , पुणे यांनी २०१४ मध्ये प्रकशित केला आहे.
        हा ग्रंथ लेखकांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आणि शास्वत विकास प्रणाली विविध ठिकाणी राबवून आलेल्या अद्ययानावर आधारित आहे. या पुस्तकात मानव संस्कृतीपुढे उभी ठाकणारी  विविध आव्हाने आणि उपलब्ध सुसंधी यांचा एकत्रितपणे विचार करून आणि ग्रामीण भागातल्या विविध बलस्थानांच्या उपयोग "पुरा " या शाश्वत विकास प्रणालीचा उहापोह केला आहे.




2 comments:

  1. Thank you Mayara, Please suggest me any thing new concept if you want to add. And please follow the Blog.

    ReplyDelete