भारतीय संविधान दिन
" 26 नोव्हेंबर 1949 "
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान संविधान सभेचे
भारतीय संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.२६ नोव्हेंबर रोजी देशाच्या संविधानाच्या स्वीकृतीच्या स्मरणार्थ भारतात साजरा केला जातो. आपल्या संविधानात शाश्वत मूल्ये आहेत जी आपली मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करत आहेत.
भारतीय संविधान दिनानिमित्त ऑनलाईन पलब्ध माहिती आपण जाणून घेऊ यात.
( खालील पैकी कोणत्याही शिर्षकावर क्लीक केल्यास संपूर्ण माहिती मिळेल/ Click on any of the following headings )
Thank you ..
ReplyDeleteमहत्वपूर्ण संकलन. .
ReplyDeleteखूप छान...
ReplyDeleteMhatvpurn mahiti dili aahe 🌍🌍
ReplyDelete